Pune Fire: पुण्यात येवळेवाडी भागात गोदामाला आग; अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल (Watch Video)

पुण्यामध्ये येवळेवाडी भागात एका गोदामाला आग लागली असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत.

Pune Fire | Twitter/ANI

पुण्यामध्ये येवळेवाडी  भागात एका गोदामाला आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान या आगीनंतर धुराचे लोट दिसत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. ही आग कपड्याच्या गोदामाला लागली असून झपाट्याने ती पसरली आहे. या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतू सुमारे 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now