Pune-Bengaluru IndiGo Flight सुमारे 5 तास उशिराने; 'कामाच्या तासांचं' कारण देत पायलटने विमान उडवण्यास दिला नकार; संतापलेल्या प्रवाशांचा व्हीडीओ वायरल (Watch Video)
कामाच्या वेळेवर असलेलं निर्बंध पाहता आपण विमान आता उडवू शकत नसल्याचं पायलटने सांगितले आणि सुमारे 5 तास प्रवासी अडकल्याची घटना समोर आली आहे.
Pune to Bengaluru तब्बल 5 तास उशिरा उडाल्याने प्रवाशांमध्ये मोठा संताप पहायला मिळाला आहे. पायलटने विमानाचं उड्डाण करण्यास उशिर केल्याने हा खोळंबा झाला. दरम्यान त्याच्याकडून duty hour restrictions चं कारण पुढे करण्यात आले आहे. हा प्रकार 24 सप्टेंबरचा आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ वायरल होत आहे. पुण्यातून 12.45 ला विमान टेक ऑफ करणं अपेक्षित होतं पण ते पहाटे 5.44 ला निघाले आणि 6.50 ला टेक ऑफ झाले. कामाच्या वेळेवर असलेलं निर्बंध पाहता आपण विमान आता उडवू शकत नसल्याचं पायलटने सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)