President Droupadi Murmu Pune Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबरला सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांवर देखील 3 सप्टेंबरला बंदी असणार आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 सप्टेंबरला पुणे दौर्यावर येणार आहे. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर आता 3 सप्टेंबरला सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार असल्याची माहिती यांनी दिली आहे. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा बंद असतील तसेच पहाटे 00.10 वाजल्यापासून रात्री 24.00 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई असणार आहे. यापूर्वी 29 जुलैला त्यांचा पुणे दौरा आयोजित होता मात्र तो पावसामुळे रद्द झाला होता.
राष्ट्रपती पुणे दौर्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी पहाटे ००.१० वाजल्यापासून ते रात्री २४.०० वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात....१/२
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2024 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

