Pune Water Cut on August 22: पुणे महानगर पालिकेकडून देखभालीच्या कामासाठी गुरूवारी पाणी कपात जारी; पहा कोणत्या भागात होणार परिणाम?
जुन्या आणि नवीन पर्वतीच्या वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट मध्ये तातडीच्या देखभालीच्या कामांसाठी ही पाणी कपात होणार आहे.
पुणे मनपा कडून 22 ऑगस्ट, गुरूवारी शहरात पूर्ण पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जुन्या आणि नवीन पर्वतीच्या वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट मध्ये तातडीचं देखभालीचं काम हाती घेण्यात येणार आहे. 22 ऑगस्टच्या पाणी कपातीचा परिणाम 23 ऑगस्टला देखील होणार आहे. या पाणी कपातीचा परिणाम नवीन आणि जुने पार्वती जलशुद्धीकरण केंद्र, खडकवासला जॅकवेल, पार्वती टँकर पॉइंट, लस्कर वॉटर सेंटर, वडगाव वॉटर सेंटर, वाजे वॉटर सेंटर, चांदणी चौक टँकिंग एरिया, गांधी भवन टँकिंग एरिया, पॅनकार्ड क्लब जीएसएआर टँकिंग एरिया, वाजे वॉटर सेंटर जीएसएआर टँकिंग एरिया, SND MLRS आणि HLRS, आणि चतुश्रुंगी टँकिंग या भागात पाणी कपातीचा परिणाम होणार आहे. रहिवाशांना पुरेसा पाणी साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये 22 ऑगस्टला पाणी कपात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)