PM Narendra Modi Pune Visit Cancelled: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा पावसामुळे रद्द
काल पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे रस्ते जलमय झाले होते. सभास्थळी देखील चिखल असल्याने आजचा मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, 26 सप्टेंबरचा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. काल पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात 1938 नंतर म्हणजेच 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. सभास्थळी देखील चिखल झाला आहे. त्यामुळे जनहित आणि सुरक्षा पाहता आजचा मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आज मोदी पुण्यात 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी येणार होते.
पीएम मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द
PM @narendramodi's visit to Pune, Maharashtra cancelled due to the heavy rain situation in the city. pic.twitter.com/jdKvxOk2Gy
— DD News (@DDNewslive) September 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2024 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

