PM Modi Tweet: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचं अनोख ट्विट, आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केलं आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेबां मधील संभाषणा दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आज हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती. मुंबईसह महाराष्ट्रात आज बाळासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रामांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध बड्या नेत्यांसह खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केलं आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेबां मधील संभाषणा दरम्यानच्या  आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेबांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले, असा आशयाचं ट्विट पंतप्रधान मोदींनी  हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now