PM Modi Mumbai Visit Traffic Advisory: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; पोलिसांकडून ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी, जाणून घ्या
मुंबई मेट्रोने जारी केलेल्या सर्व्हिस अपडेटनुसार, घाटकोपर-वर्सोवा मेट्रो ब्लू लाईन 1 संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये 1 तास 45 मिनिटांसाठी बंद असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिणेकडील वाहतूक दुपारी 4:15 ते 5:30 वाजेपर्यंत होती, तर उत्तरेकडील वाहतूक संध्याकाळी 5:30 ते 6:45 पर्यंत संथ चालणार आहे. त्यानुसारच प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच उद्या दुपारी 12 ते 9 या वेळेत पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.
मुंबई मेट्रोने जारी केलेल्या सर्व्हिस अपडेटनुसार, घाटकोपर-वर्सोवा मेट्रो ब्लू लाईन 1 संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये 1 तास 45 मिनिटांसाठी बंद असेल. पीएम मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे जाहीर सभेला संबोधित करतील अशी अपेक्षा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम द्रुतगती महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी बीकेसी मधील कार्यालयांना आवाहन केले आहे की, वाहतूक समस्या टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या कर्मचार्यांना कार्यालये सोडण्याची परवानगी द्यावी.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)