Viral Video: जळगाव रेल्वे स्थानकावर रुळ क्रॉस करुन जाण्याच्या घाईत प्रवासी अडकले 2 गाड्यांच्या मध्ये; पहा हृद्याचा ठोका चुकणारा व्हीडिओ (Watch Video)
रेल्वेचा रूळ ओलांडणं हा दंडनीय अपराध आहे, यामध्ये रेल्वे प्रशासन दंडासोबत प्रवाशांना तुरूंगवासाची शिक्षा देखील ठोठावू शकतो.
जळगाव रेल्वे स्थानकामध्ये एका रेल्वे गाडीतून प्लॅटफॉर्मवर न उतरता ट्रॅक वर उतरून दुसरा ट्रॅक ओलांडण्याचा प्रकार काही प्रवाशांच्या जीवार बेतणार होता. दरम्यान प्लॅटफॉर्म वरील आरपीएफ जवान आणि अन्य प्रवाशांनी त्यांना अलर्ट करून मागे होण्याचा सल्ला दिला आणि मोठा अनर्थ टळला आहे. ट्रॅक वर 3-4 जण उतरले होते. दुसरीकडून वेगात एक्सप्रेस गाडी जाणार होती पण समोरचे अनभिज्ञ होते. त्यापैकी काहींना पुन्हा वर चढवण्यात आले तर दोन जण खालीच दोन ट्रॅक मध्ये जीव मुठीत घेऊन उभे होते. सारा प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला असून आता सोशल मीडीयात वायरल होत आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)