Pankaja Munde: 'जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो', 'हात जोडून विनंती करते'; समर्थकांच्या आत्महत्यांनंतर पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन (Watch Video)
लोकसभा निवडणुकीत पराभव जिव्हारी लागलेल्या तीन पंकजा मुंडे समर्थकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी व्हीडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे.
Pankaja Munde: बीड लोकसभा मतदारसंघात(Beed Lok Sabha Result 2024) पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane)यांनी पंकजा यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यात पंकजा समर्थकांच्या आत्महत्यांची मालिका सुरू झाली. त्या थांबवण्यासाठी पंकजा मुंडे (,Pankaja Munde)यांनी आता सर्व समर्थकांना भावनिक आवाहन केले आहे. पराभव जिव्हारी लागलेल्या तीन समर्थकांनी नैराश्यातून आत्महत्या (Pankaja Munde supporter suicide)केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी गुरुवारी एक व्हीडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना धीर देण्यासोबतच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे.
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)