Palghar Bus Fire: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या बसने घेतला अचानक पेट, थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

या बसमध्ये 14 प्रवाशी होते, सर्व आता सुखरुप आहे.

Palghar Bus Fire

पालघरमध्ये (Palghar) मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरावरील (Mumbai-Ahmedabad highway) चिंचपाडा येथे खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून बस जळून खाक झाली आहे. बसला आगल्याचे समजताच चालकाने बस बाजूला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. ही बस अहमदाबादवरुन (Ahmedabad) हैद्राबादला (Hyderabad) चालली होती. या बसमध्ये 14 प्रवाशी होते, सर्व आता सुखरुप आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)