Palghar Food Poising: पालघर मध्ये 11 सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; 250 पेक्षा जास्त विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये दाखल
पालघर मध्ये 11 सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 250 पेक्षा जास्त विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून हा भोजन पुरवठा करण्यात येतो. हे सेंट्रल किचन राज्य सरकार कडून चालवलं जातं. सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी होती. या भाजीमधून ही विषबाधा झाली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)