Palghar: पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch)

आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पालघर अग्निशमन दलाने याबाबत माहिती दिली आहे.

Palghar: पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch)
Fire (PC - File Image)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पालघर अग्निशमन दलाने याबाबत माहिती दिली आहे. या आगीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

याआधी मुंबईतील कुर्ला परिसरात अनेक गोदामांना भीषण आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2023 11:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).