9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्यात 'स्वराज्य महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन; जाणून घ्या राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव स्तरीय कार्यक्रम
'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात 'स्वराज्य महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात 'स्वराज्य महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
'स्वराज्य महोत्सव' अंतर्गत राज्य स्तरावरील कार्यक्रम-
समूह राष्ट्रगान, आयकॉनिक सांस्कृतिक कार्यक्रम, कॉफीटेबल बुक प्रकाशन, 60 मान्यवरांच्या लेखांच्या ग्रंथाचे प्रकाशन, गिरगाव चौपाटीवर आकर्षक विद्युत रोषणाई. इ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन-
हुतात्मा स्मारके सुशोभिकरण, रस्ते संग्रहालय, 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभेचे आयोजन, एनसीसी/एनएस एस सायक्लोथॉन/ मॅरेथॉन स्पर्धा आयोजन, विविध निबंध, चित्रकला व वत्कृत्व स्पर्धा आयोजन, प्रदर्शने, हर घर तिरंगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तालुकास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन-
वृक्षारोपण मोहीम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, वारसा स्थळ / पुरातत्व दत्तक योजना, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आकाम लोगो, स्वच्छता मोहीम, संविधान स्तंभ उभारणी
ग्रामस्तरावर कार्यक्रमाचे आयोजन-
विशेष ग्रामसभा, हर घर तिरंगा, प्रभात फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावे, मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा, अर्थसाक्षरता विषयक शिबीर, शेतकरी मेळावे, पर्यावरण संर्वधन शपथ, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन “स्वराज्य महोत्सवांतर्गत करण्यात आले आहे.
जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी या उद्देशाने भारतीय #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान राज्यात #स्वराज्यमहोत्सव कार्यक्रम होईल. यात राज्य ते ग्रामस्तरावर विविध उपक्रम होणार आहेत. pic.twitter.com/aAD9prX72J
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2022 10:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

