Good Samaritan: आता अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीला मिळणार पुरस्कार
रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरित करतात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने अपघाताच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेणाऱ्या गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरित करतात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.
मोटार अपघातग्रस्तास सुरुवातीच्या काही तासात हॉस्पिटल्स किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घेऊन जाणाऱ्या ‘गुड समेरिटन’ला अपघातग्रस्ताचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. pic.twitter.com/OFSzL0zV0b
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2022 11:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

