Night Block in Mumbai: गोरेगाव-कांदिवली दरम्यान 23-24 सप्टेंबर रोजी रात्री 11:00 ते पहाटे 5:30 पर्यंत ब्लॉक; पहा गाड्यांच्या वेळा आणि इतर तपशील

ब्लॉक दरम्यान, सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान रात्री 11.30 ते पहाटे 03.30 पर्यंत अप स्लो मार्गावर धावतील.

Photo Credit- X

Night Block in Mumbai on Monday, September 23, 2024: गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या 6व्या मार्गिकेचे बांधकाम सुलभ करण्यासाठी, मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री म्हणजेच 24 व 25 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत 5 व्या मार्गावर आणि अप फास्ट मार्गावर साडेसहा तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय गाड्या प्रभावित होतील. ब्लॉक कालावधीत जवळपास 50 गाड्या रद्द किंवा कमी कालावधीसाठी रद्द केल्या जातील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक दरम्यान, सर्व अप फास्ट मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान रात्री 11.30 ते पहाटे 03.30 पर्यंत अप स्लो मार्गावर धावतील. सर्व अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस सकाळी 11.00 ते 05.30 पर्यंत अंधेरी ते बोरिवली दरम्यान अनुक्रमे अप आणि डाऊन जलद मार्गांवर धावतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी कृपया वरील व्यवस्थेची नोंद घ्यावी असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. (हेही वाचा: Mumbai Crime: मुंबई लोकलमध्ये दंड ठोठावला म्हणून प्रवाशाची तिकीट तपासकाला हॉकी स्टिकने मारहाण)

Night Block in Mumbai-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now