New Year's eve Special Mumbai Local Train: नववर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वे चालवणार स्पेशल ट्रेन्स; इथे पहा वेळा !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याण आणि पनवेल साठी रात्री उशिरा ट्रेन चालवली जाणार आहे.

Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये रात्री उशिरापर्यंत नवं वर्षाचं सेलिब्रेशन सुरू असतं. या सेलिब्रेशननंतर रात्री उशिरा ट्रेन अभावी नागरिकांचा खोळंबा होऊ नये म्हणून मुंबई लोकलच्या विशेष फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता ट्रेन सुटेल आणि 3 वाजता कल्याणला पोहोचेल आणि 1.30 वाजता कल्याणहून सुटणारी ट्रेन 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. हार्बर मार्गावर विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल. तर पनवेलहून 1.30 वाजता निघालेली ट्रेन 2.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. Mumbai Police Announces Restrictions on Firecracker Usage: मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या आधी फटाक्यांच्या वापरावर निर्बंध केले जाहीर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now