Navi Mumbai Schools Closed Tomorrow: हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा; नवी मुंबईतील शाळा उद्या राहणार बंद

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

School Students | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Navi Mumbai Schools Closed Tomorrow: मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आह्रे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. आयएमडीने उद्याही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे.

महापालिकेने सांगितले आहे, ‘सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन, तसेच हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेत शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.’ (हेही वाचा: Thane Schools Closed Tomorrow: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर; आदेश जारी)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement