Municipal Corporations Elections: महापालिका निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण वगळून 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश
महिलांसाठी तीन प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार
मुंबई, पुणे तसेच ठाण्यासह 14 महापालिकांमध्ये निवडणुकांसाठी 31 मे रोजी इतर मागास वर्ग -ओबीसी आरक्षण वगळून प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांचा यात समावेश करण्यात आला आहे.
ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे महिलांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण गटातील महिला या तीन प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)