Mumbai Metro Update: मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूषखबर! 'या' 2 मेट्रोंचा शेवटचा थांबा दहिसर पूर्व पर्यंत वाढवला
मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नव्या लाईनच्या मेट्रो सेवांचे लोकार्पण केले आहे.
मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूषखबर आहे. प्रवाशांच्या मागणीची दखल घेत आता अंधेरी वेस्ट ते दहिसर पूर्व दरम्यान धावणार्या मार्गावर रात्री 21.43 आणि 22.00 च्या 2 मेट्रो सेवा डहाणूकर वाडी ऐवजी शेवटचा थांबा दहिसर पूर्व पर्यंत धावतील. मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी रेड लाईन आणि यलो लाईन मार्गांवर नवी मेट्रो सेवा सुरू केली आहे. यामुळे WEH वर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)