Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आज उष्ण व दमट परिस्थिती; संध्याकाळी मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

एकीकडे उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दोन दिवसांत झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी, आज मुंबईमध्ये सकाळपासून तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईतील तापमानात बुधवारी झालेली वाढ गुरुवारीही कायम होती.

Mumbai weather (Photo Credit - Twitter)

Mumbai Weather Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहेत. एकीकडे उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दोन दिवसांत झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी, आज मुंबईमध्ये सकाळपासून तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईतील तापमानात बुधवारी झालेली वाढ गुरुवारीही कायम होती. हवामान अंदाजानुसार आता पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यासह संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आज शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36°C आणि 29°C च्या आसपास असेल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. (हेही वाचा: Monsoon Update: मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात होणार दाखल)

पहा मुंबईसाठी हवामान केंद्राचा अंदाज-  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now