Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Photo Credit : X

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान खात्याच्या (IMD)अंदाजानुसार आज सोमवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी(Yellow Alert in Mumbai) करण्यात आला आहे. मुंबईत वेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. अपेक्षित परिस्थितीनुसार, मुंबईत कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मुंबईतील रहिवाशांना हवामान अहवालांवर अपडेट राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. (हेही वाचा:Ujani Dam Overflow: सोलापूरचे उजनी धरण भरले, 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, कोकणासह पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा: Pune Rain News: पुणे - पिंपरीत पाणीच पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा बंद)

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आज सोमवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)