हवामान अंदाज: मुंबई मध्ये पुढील 48 तासांसाठी उन्हाच्या काहिलीपासून मिळणार सुटका; पहा उद्याचा हवामान अंदाज

उद्याच्या मुंबई हवामान अंदाजानुआर शहरात वातावरण थंड राहणार आहे. 25-26 सप्टेंबरला मुंबई शहरात पारा 30 अंशाच्या खाली जाणार आहे.

Mumbai Weather | File Image

मुंबई मध्ये परतीचा पाऊस सध्या कोसळत असल्याने मागील काही दिवस वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांची सुटका होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तास म्हणजे 25-26 सप्टेंबरला मुंबई मध्ये तापमान 4-5 अंश खाली जाण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्य माहितीनुसार, आगामी दोन दिवस हे सप्टेंबर महिन्यातील सर्वात थंड दिवस असू शकतील. सध्या 32 अंशावर असलेला पारा 27-28 अंशापर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.

Finally, Break from heat..

पहा मुंबई हवामानाची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now