Mumbai Traffic: जोरदार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या वाहतूक विभागाच्या सुचना
नेताजी पालकर चौकात 2 फूट पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला (Kurla), अंधेरी (Andheri) अशा विविध भागांमध्ये पाणी साचलं असुन अनेक मार्गावर वाहतूक (Traffic Jam) कोंडी निर्माण झाली आहे. तरी मुंबई वाहतूक (Mumbai Traffic) विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. नेताजी पालकर (Netaji Palkar) चौकात 2 फूट पाणी साचल्याने अंधेरी (Andheri Subway) भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच सहारा स्टार हॉटेल (Sahara Star Hotel), वाकोला जंक्शन (Vakola Junction) येथे पाणी साचल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीची गती मंदावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)