Mumbai Traffic Update: महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभुमिवर मुंबईतील वाहतुकी संबंधी विशेष सुचना जारी, जाणून घ्या पर्यायी मार्ग
५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान वाहतुकीचे हे नियम लागू होतील असी माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. गेले दोन वर्ष कोव्हिड निर्बंधांमुळे नियमांचं पालन करत हा उत्सव अटीसर्तीसह साजरा करण्यात आला. पण यावर्षी विनानिर्बध महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभुमिवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) नमन करण्यास हजेरी लावतात. याचं पार्श्वभुमिवर मुंबई वाहतुक विभागाकडून विशेष सुचना आणि पर्यायी मार्ग जारी करण्यात आले आहेत. ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान वाहतुकीचे हे नियम लागू होतील असी माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून (Mumbai Traffic Police) देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)