Cyclone Biparjoy दरम्यान मुंबईच्या जुहू बीचवर सहा जण समुद्रात बुडाले; दोघांची सुटका, चार बेपत्ता, बचावकार्य सुरू
सध्या 'बिपरजॉय' वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील प्रसिद्ध जुहू बीचवर आंघोळीसाठी गेलेले सहा जण सोमवारी समुद्रात वाहून गेले. या 6 जणांपैकी 2 लोकांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र 4 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यासाठी शोध मोहीम सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली. ही घटना सायंकाळी 5.28 ची आहे. बीएमसी, पोलीस, वॉर्ड कर्मचारी आणि रुग्णवाहिका टीम बचावकार्यात सहभागी आहे. सध्या 'बिपरजॉय' वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 15 जून रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बिपरजॉय धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत दोन अतिरिक्त पथके तैनात केली आहेत. (हेही वाचा: Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ रौद्र रूपात; समुद्रात उंच लाटा Watch Video)