Mumbai Rains: गोरेगाव आयटी पार्क जवळ रस्ता खचला; रस्त्याची एक बाजू वाहतूकीसाठी बंद (Watch Video)

गोरेगाव आयटी पार्क परिसरात रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी सायन-चेंबूर परिसरामध्येही रस्ता खचला होता.

IT Park in Goregaon | Twitter

मुंबई मध्ये पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडण्याची समस्या जुनी आहे. अशामध्ये आता पावसात अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचा देखील प्रकार समोर येत आहे. उपनगरामध्ये काल रात्रीपासून होत असलेल्या पावसात दरडी कोसळल्याच्या लहान सहान घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामध्ये गोरेगाव आयटी पार्क परिसरात देखील अशाच प्रकार आज समोर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्यावर एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. Mumbai Andheri Landslide: मुंबईतील अंधेरी परिसरात इमारतीवर दरड कोसळली, कोणतेही जीवितहानी नाही .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now