Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे अंधेरीत पाणी साचले, अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

तसेच राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस चांगला पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस चांगला पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबईत पडलेल्या सकाळपासुन मुसळधार पावसामुळे अंधेरीत पाणी साचले आहे. तसेच अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे वाहतूक स्वामी विवेकानंद रोडच्या दिशेने वळवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now