Bomb Threat in Dharavi: धारावीत बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; कॉलरच्या शोधासाठी तपास सुरू

धारावीतील राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना रविवारी सकाळी आला. त्यानंतर पोलिसांनी परिसराचा तपास केला मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळली नाही.

Photo Credit- X

Bomb Threat in Dharavi: मुंबई पोलिसांना रविवारी सकाळी धारावीतील (Dharavi) राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आला. त्यावर तातडीने कारवाई करत, पोलिसांनी बॉम्ब शोध पथकासह (Bomb Threat) परिसरात धाव घेतली आणि कसून चौकशी केली. सविस्तर शोध घेतल्यानंतर सुदैवाने कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा उपकरणे पोलिसांना आढळली नाहीत. खोट्या फोननंतर, अधिकाऱ्यांनी बॉम्बच्या धमकीबाबत गुन्हा दाखल केला आहे आणि जबाबदार कॉलरचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

धारावीत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now