Mumbai Police: वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल, तलवार घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) थेट कारवाई करत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Varsha Gaikwad, Aslam Sheikh, | (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) थेट कारवाई करत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात तलवार हातात घेऊन प्रदर्शन केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, मंत्री आणि काँग्रेस नेत्यांचा तलवार हातात घेऊन त्याचे प्रदर्शन केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओचीच नोंद घत पोलिसांनी ही कारवाई केली. प्राप्त माहिती अशी की, मुंबई पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या स्वागतासाठी वांद्रे येथील रंगशारदा भवनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी काँग्रेस मंत्री आणि काँग्रेस नेत्यांनी तलवार उंचावत त्याचे प्रदर्शन केले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला भाजप नेते मोहित कंबोज यांनी दावा केला आहे की, मुंबई पोलिसांनी आपण केलेल्या तक्रारीच्या आधारेच हा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कंबोज यांनी एक ट्विटही केले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now