Mumbai Police: नात्यात होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाबाबत उघडपणे बोलून, त्याबद्दल 100 नंबरवर तक्रार करण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन
मुंबई पोलिसांनी बुधवारी लोकांना नात्यात होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाबाबत उघडपणे बोलून त्याबद्दल तक्रार करण्यास सांगितले
मुंबई पोलिसांनी बुधवारी लोकांना नात्यात होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाबाबत उघडपणे बोलून त्याबद्दल तक्रार करण्यास सांगितले. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जनतेला समोर येऊन पोलिसांचा टोल फ्री क्रमांक 100 डायल करून होणाऱ्या छळाबाबत तक्रार करण्याचे आवाहन केले गेले. यावेळी मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, 'आपल्या स्वत:बाबत किंवा आपल्या परिचितांपैकी कोणाबद्दल काही चुकीचे घडत असल्याची शंका असल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्या! आपली एक तक्रार एका व्यक्तीचे, एका कुटुंबाचे आयुष्य वाचवू शकेल.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)