Mumbai Police Action on Uorfi Javed's Video: उर्फी जावेदच्या 'त्या' फेक व्हिडिओबाबत मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल, म्हणाले- 'स्वस्त प्रसिद्धीसाठी, कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही'

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस अधिकार्‍यांच्या पोशाखात दोन महिला पोलीस उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अटक करतात व तिला एका वाहनातून घेऊन जातात.

Mumbai Police Action on Uorfi Javed's Video

शुक्रवारी सोशल मीडियावर उर्फी जावेदच्या बनावट अटकेच्या व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती आता या व्हिडिओबाबत मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सोशल मिडिया X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट जारी करत मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांनी या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस अधिकार्‍यांच्या पोशाखात दोन महिला पोलीस उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अटक करतात व तिला एका वाहनातून घेऊन जातात.

याबाबत मुंबई पोलीस म्हणतात, 'स्वस्त प्रसिद्धीसाठी, कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही. मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडिओ खरा नाही-सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे. मात्र, दिशाभूल करणार्‍या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरूद्ध, ओशिवरा पोलिस ठाणे येथे कलम १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असताना, तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि वाहनही जप्त करण्यात आले आहे.' (हेही वाचा: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पोहचवण्याचे सारे आरोप Elvish Yadav ने टाळले; पोलिसांना तपासात मदतीचे आश्वासन)