Mumbai Monsoon Date: मुंबईकरांना लवकरच मिळणार उष्णतेपासून दिलासा; यंदा 10-11 जून रोजी शहरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता- IMD Chief

यंदा मुंबईत मान्सूनने 10-11 जून रोजी आगमन होईल अशी अपेक्षा आहे. दक्षिण महाराष्ट्रात साधारण 5 जून मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Mumbai Monsoon

Mumbai Monsoon Date: देशभरातील अनेक शहरांमध्ये यावेळी तीव्र उष्मा जाणवत आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. अशात हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सूनचे भारतात नियोजित वेळेच्या काही दिवस आधी आगमन झाले आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. उष्णतेची लाट आणि मान्सून आणि हवामान अंदाजाविषयी, आयएमडी मुंबईचे प्रमुख सुनील जी कांबळे म्हणतात, 'मुंबईमध्ये, 34-35 अंश सेल्सिअसच्या आसपासचे तापमान हे उन्हाळी हंगामासाठी सामान्य तापमान आहे, परंतु शहरातील आर्द्रता पातळी 70-80% पेक्षा जास्त आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे, तो केरळमध्ये 31 मे रोजी पोहोचेल आणि यंदा मुंबईत मान्सूनने 10-11 जून रोजी आगमन होईल अशी अपेक्षा आहे.' दक्षिण महाराष्ट्रात साधारण 5 जून मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Ratnagiri Five People Drowned: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now