Mumbai MHADA Lottery Result 2023 Winners List: मुंबई म्हाडा लॉटरीचे निकाल जाहीर; पहा 4082 घरांसाठी भाग्यवान विजेत्यांची यादी

सोडतीमध्ये मुख्यतः गोरेगावच्या उपनगरी भागात असलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) योजनेअंतर्गत 1,947 सदनिका समाविष्ट आहेत.

Mumbai Mhada Lottery 2023

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) ने मुंबई बोर्ड हाउसिंग लॉटरी 2023 चे निकाल जाहीर केले आहेत. मुंबई म्हाडासाठी 4,082 सदनिकांची लॉटरी सोमवारी वायबी चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली. कोविडनंतर अशा प्रकारची ही पहिलीच लॉटरी आहे. यासाठी सुमारे 1.20 लाख लोकांनी बोली लावली होती. हे फ्लॅट तारदेव, सायन, अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर आणि पवई येथे आहेत. सोडतीमध्ये मुख्यतः गोरेगावच्या उपनगरी भागात असलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) योजनेअंतर्गत 1,947 सदनिका समाविष्ट आहेत.

एकूण घरांपैकी 2,790 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS), 1,034 निम्न उत्पन्न गटासाठी (LIG), 139 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG), आणि 120 घरे उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2023 निकालाचे निकाल तपासण्यासाठी ‘या’ ठिकाणी क्लिक करा.

(हेही वाचा: महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणार मोफत उपचार; 15 ऑगस्टपासून सुरु होणार निणर्याची अंमलबजावणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)