Mumbai Metro 3 Timing Update: बीकेसी ते आरे यांना जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या वेळेत 25 व 26 एप्रिल रोजी बदल, जाणून घ्या सुधारीत वेळा
मुंबई मेट्रो लाईन 3 च्या वेळेत दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे. 25 आणि 26 एप्रिलसाठी या मेट्रोच्या सुधारित ऑपरेशनल वेळापत्रकांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईमधील अॅक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते आरे स्ट्रेच दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या वेळेत दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे. 25 आणि 26 एप्रिलसाठी या मेट्रोच्या सुधारित ऑपरेशनल वेळापत्रकांची घोषणा करण्यात आली आहे. तात्पुरत्या सुधारणांसाठी तांत्रिक कारणांचा हवाला देत गुरुवारी मुंबई मेट्रो लाईन 3 च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे हे बदल कळवण्यात आले. अधिसूचनेनुसार, 25 एप्रिल, शुक्रवार रोजी सकाळी 6.30 ते 9.30 आणि 26 एप्रिल, शनिवार रोजी सकाळी 7.30 रात्री 9.30 पर्यंत सेवा सुरू राहतील. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन केले आहे. सध्या, आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पर्यंत पसरलेला अॅक्वा लाईनचा पहिला टप्पा कार्यरत आहे आणि तो सुरू झाल्यापासून हजारो दैनंदिन प्रवाशांना सेवा देत आहे. 10 स्थानकांचा समावेश असलेला हा विभाग सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा दरम्यान दररोज 96 फेऱ्या देतो, ज्यामुळे आरे आणि बीकेसी दरम्यानचा प्रवासाचा वेळ रस्त्याने एका तासापेक्षा कमी होऊन फक्त 30 मिनिटांचा झाला आहे. (हेही वाचा: Elphinstone Bridge: ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल उद्यापासून बंद; वाहतूक व्यवस्थापनातले 'हे' महत्त्वाचे बदल जाणून घ्या)
Mumbai Metro 3 Timing Update:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)