Mumbai: गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, जुहू चौपाटीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू

जुहू चौपाटीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. ही वीज जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर पडली. त्यानंतर या तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dead-pixabay

गणेश विसर्जन सुरू असताना ढगांच्या गडगटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस देखील सुरू आहे. दरम्यान, जुहू चौपाटीवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. ही वीज जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर पडली. त्यानंतर या तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आली. या घटनेने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now