Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजही AC मुंबई लोकलच्या काही फेर्या तांत्रिक त्रृटींमुळे Non AC धावणार; इथे पहा वेळापत्रक
पश्चिम रेल्वे मार्गावर आज 13 एसी लोकल नॉन एसी माध्यमातून चालणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये आजही पश्चिम रेल्वे मार्गावर काही एसी लोकल फेर्या रद्द करून त्या नॉन एसी चालवल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वेने तांत्रिक त्रृटींचं कारण देत या लोकल फेर्या रद्द असल्याचं सांगितलं आहे. एसी लोकलला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे पण सध्या या लोकल फेर्या थांबवण्यात आल्या आहेत. कालही अशाच प्र्कारे काही लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या पावसाने दडी मारल्याने आणि हवेतील आर्द्रता वाढली असल्याने उकडा जाणवत आहे. अशात आता एसी लोकल रद्द झाली असल्याने अनेकांना घामाघूम होऊन प्रवास करावा लागणार आहे.
पहा आज नॉन एसी चालवल्या जाणार्या एसी लोकल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)