Mumbai Local Updates: सायन-कुर्ला स्थानकात रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मध्ये रेल्वेच्या दादर ते कुर्ला दरम्यान वाहतूक खोळंबली
दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास असलेली भरती, सकाळपासून कोसळणार्या पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने आणि मिठी नदीचे दरवाजे बंद केल्याने आता पुढील आदेशापर्यंत दादर- कुर्ला स्थानकादरम्यान वाहतूक खोळंबली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास असलेली भरती, सकाळपासून कोसळणार्या पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने आणि मिठी नदीचे दरवाजे बंद केल्याने आता पुढील आदेशापर्यंत दादर- कुर्ला स्थानकादरम्यान वाहतूक खोळंबली आहे. तर चुनाभट्टी स्थानका मर्यादित वेगामध्ये रेल्वे सुरू आहे. दरम्यान 12.50 नंतर फास्ट लाईन पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे.
शिवाजी सुतार यांची माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)