Mumbai Heatwave Alert: मुंबई मध्ये वाढतोय उन्हाचा तडाखा; पारा चाळीशी पर्यंत जाण्याचा अंदाज
तीव्र हवामानाच्या परिस्थितीसाठी सज्ज असल्याने रहिवाशांना परिस्थितीबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
मुंबई आणि आजुबाजूच्या भागात आता उन्हाच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. सध्या मुंबई मध्ये दुपारच्या वेळी उन प्रखर जाणवत आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात 6-11 मार्च दरम्यान तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. Independent weatherman Rushikesh Agre यांच्या माहितीनुसार, उपनगरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फेब्रुवारीतील सर्व रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो. शहर या तीव्र हवामानाच्या परिस्थितीसाठी सज्ज असल्याने रहिवाशांना परिस्थितीबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
मुंबईत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)