Mumbai Fire: मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीमध्ये भीषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू

या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.

Fire | Pixabay.com

मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील एका 11 मजली इमारतीला आज संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली होती. या घटनेत हर्षदा पाठक (वय 95) नावाची महिला जखमी झाली होती. घटनेनंतर तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आता रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केले. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा: Bombay HC On Firecrackers: यंदा मुंबईकरांना फक्त दोन तासच फटाके फोडता येणार, हायकोर्टाने दिला आदेश; जाणून आतिषबाजीची वेळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement