Mumbai Fire: सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल (Video)

अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

Fire (PC - File Image)

Mumbai Fire: काल मुंबईमधील गोरेगाव येथे राम मंदिर स्थानकाजवळ मोठी आग लागल्याची घटना घडली होती. आता आज पुन्हा एकदा शहरातून अशीच एक आगीची घटना समोर आली आहे. सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या घटनेमागील ठोस कारण अद्याप समोर आले नाही. या आगीच्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धुरांचे लोट दिसून येत आहेत. (हेही वाचा: Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव जवळील इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)