Mumbai Fire: मुंबईतील भेंडी बाजारमध्ये 4 मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
घटनास्थळी अग्निशमन दलाचे 4 बंब आणि 3 पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत.
Mumbai Fire: मुंबईतील भेंडी बाजार (Bhindi Bazaar) परिसरात 4 मजली इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल( Fire Brigade)चे 4 बंब आणि 3 पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. इमारतीतून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या तेथे आग विझविण्याचे काम सुरू आहे. आग लागल्याचे कळताच परिसरात नागरिकांनी आरडाओरड केला. त्यामुळे तेथे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईतील भेंडीबाजार हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर मानला जातो. नागरिकांची मोठी वर्दळ, एकमेकांनी लागून असलेल्या इमारती इथे आहेत. त्यामुळे मोठ्या नुकसानीचा धोका निर्माण झाला होता. (हेही वाचा:Mohania Fire: मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग, घटनेत दुचाकी जळून खाक (Watch Video) )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)