Mumbai Crime: मॉडेलच्या 'वेब सीरिज ऑडिशन'चा इंटिमेट व्हिडिओ Porn Site वर अपलोड केला; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तिने हिंदी सिनेमा किंवा मालिकांमध्ये कामाच्या शोधात अनेक प्रॉडक्शन हाऊसला भेट दिली होती.

मुंबईजवळ राहणाऱ्या एका 18 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीने एका प्रोडक्शन हाऊसमधील चार लोकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे. तिचा आरोप आहे की, त्यांनी 'वेब सीरिज ऑडिशन'साठी शूट केलेला एक व्हिडिओ एका पॉर्न साइटवर अपलोड केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती तिला एका मैत्रिणीने दिली, त्यानंतर तिने याबाबत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीची नोंद मंगळवारी अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि हे प्रकरण मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 3 कडे वर्ग करण्यात आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी वसई-विरार येथे आपल्या कुटुंबासह राहते. तिने हिंदी सिनेमा किंवा मालिकांमध्ये कामाच्या शोधात अनेक प्रॉडक्शन हाऊसला भेट दिली होती. काही आठवड्यांपूर्वी, तिला एका प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला व त्यांनी तिला वेब सीरिजसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. त्यानंतर ऑडिशनचा भाग म्हणून तिच्याकडून एक इंटिमेट सीन शूट करून घेतला. काही दिवसांनंतर तिचा एक अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर आढळून आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Teacher Having Sex on School Campus: बीडमध्ये शाळेच्या कॅम्पसमध्येच पुरुष शिक्षकाचे तीन महिला शिक्षकांसोबत शारीरिक संबंध; Porn Site वर पोस्ट केले व्हिडिओ; गुन्हा दाखल)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)