Mumbai Coastal Road Latest Update: मुंबई किनारी रस्ता-दक्षिण प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण; 'ड्रोन’ व्हिडिओच्या माधमातून पहा सद्यस्थिती (Video)

या मार्गाद्वारे दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह क्षेत्रास सध्याच्या वांद्रे वरळी सी लिंकद्वारे पश्चिम उपनगर असलेल्या कांदिवलीशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मुंबईची उत्तरेकडील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील कोस्टल रोड उपक्रमावर परिश्रमपूर्वक काम करत आहे. या मार्गाद्वारे दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह क्षेत्रास सध्याच्या वांद्रे वरळी सी लिंकद्वारे पश्चिम उपनगर असलेल्या कांदिवलीशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मुंबईची उत्तरेकडील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मरीन ड्राइव्हवर सध्या सुरू असलेले कोस्टल रोड बांधकाम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मुंबईतील उत्तरेकडील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, अपेक्षेनुसार सुरुवातीच्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीपर्यंतचा 10.58 किमीचा पल्ला समाविष्ट आहे. माहितीनुसार मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) आता 82.51% पूर्ण झाले आहे. मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी 2024 च्या अखेरीस कार्यान्वित होईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. आता बीएमसीने मुंबईमधील वाहतुकीला वेग देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती 'ड्रोन’च्या माध्यमातून दिली आहे. (हेही वाचा: Mumbai Water Cut: मुंबईत पुढील तीन दिवस पाणी कपात, 'या' भागात पाण्याची कमतरता)

या कोस्टल रोडवरील क्षेत्रांची प्रगती-

प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस- 83.82% पूर्ण

बडोदा पॅलेस ते वरळी-वांद्रे सी लिंक- 69.46% पूर्ण

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर (मरिन ड्राइव्ह) ते प्रियदर्शनी पार्क- 90.77% पूर्ण

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now