Mumbai-Bengaluru highway Accident: मुंबई बेंगलोर हायवेवर खासगी बसला पुण्यात अपघात, पाच प्रवासी जखमी
रात्री 11 च्या सुमारास बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस सर्व्हिस रोडवर पलटी झाली
मुंबई बेंगलोर हायववेवर पुण्यात बावधन येथे एका खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. मुंबईवरुन बेंगलोरला चाललेल्या या खासगी बसमध्ये 35 प्रवासी असल्याची माहिती मिळाली. रात्री 11 च्या सुमारास बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस सर्व्हिस रोडवर पलटी झाली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना कोथरुडच्या रुग्णायलयात भर्ती करण्यात आले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)