Mumbai Airport वर 53 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक, आरोपीला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला शुक्रवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एका प्रवाशाकडून तब्बल 53 कोटी रुपयांचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा (Addis Abba) येथून एक प्रवासी अमंली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयला (Directorate of Revenue Intelligence) मिळाली होती. या माहितीवरुन अधिकाऱ्यांनी प्रवाशाला अडवले आणि त्याच्या सामानाची कसून झडती घेतली असता त्याच्या बॅगेत कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने ड्रग्ज लपवण्यात आले होते. नंतर चाचण्यांमध्ये हे हेरॉईन असल्याचे समजले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला शुक्रवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)