Mount Everest: माउंट एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान पुण्यातील पोलीस स्वप्नील गरड 'ब्रेन डेड'

स्वप्नील गरड हे उत्तम गिर्यारोहक आहेत. याआधी त्यांनी जगातील अनेक शिखरे सर केली आहेत. गेल्या वर्षी स्वप्नील गरड यांनी जगातील सर्वात सुंदर आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड असे नेपाळचे माऊंट अमा दाबलाम शिखर सर केले होते.

Mount Everest

एव्हरेस्टच्या मोहिमेदरम्यान पुणे पोलीस दलातील कर्मचारी स्वप्नील गरड ब्रेन डेड झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलीस विभागात कार्यरत पोलीस नाईक स्वप्नील गरड यांना उपचारासाठी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वप्नील गरड ब्रेन डेडमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती पुणे पोलीस विभागातील गरड यांच्या मित्रांनी दिली आहे. स्वप्नील गरड हे पुणे पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन डेड झाल्याची माहिती पुणे पोलीस विभागातील त्यांच्या मित्रांनी दिली. त्यांच्यावर सध्या काठमांडू येथे उपचार सुरू आहेत.

स्वप्नील गरड हे उत्तम गिर्यारोहक आहेत. याआधी त्यांनी जगातील अनेक शिखरे सर केली आहेत. गेल्या वर्षी स्वप्नील गरड यांनी जगातील सर्वात सुंदर आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड असे नेपाळचे माऊंट अमा दाबलाम शिखर सर केले होते. हे शिखर जिंकल्यानंतर त्यांनी तेथे तिरंगा ध्वज फडकावला. तसेच तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेऊन त्यांना नमन केले. (हेही वाचा: Helmet Mendatorty In Navi Mumbai: दुचाकी अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नवी मुंबईत आता हेल्मेट वापरणे सक्तीचे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now