Baba Maharaj Satarkar: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचे स्मारक उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं काल निधन झालं. लाखो विठ्ठल भक्तांवर दुखाचे डोंगर कोसळले.

Baba Maharaj Satarkar | (File Image)

Baba Maharaj Satarkar: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं काल निधन झालं. लाखो विठ्ठल भक्तांवर दुखाचे डोंगर कोसळले. त्यांच्या विचारांना जिंवत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून त्यांच्या स्मारक उभरण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी बाबामहाराज सातारकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबियांचे सांत्वन केले. माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी राज्य सरकार बाबामहाराजाचं स्मारक उभारेल अशी घोषणा केली. ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचे स्मारक तर निर्माण होईलच पण,  त्यांच्या विचारांचे जीवंत स्मारक उभारण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करणार. जेणेकरून या जीवंत स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्यासारखे आणखी विचारक तयार होतील अस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement