Manorama Khedkar Sent to Police Custody: प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; पुणे कोर्टाचा निर्णय
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात मनोरमा पुण्याच्या मुळशी तालुक्यातील धडवली गावात जमिनीच्या वादावरून काही लोकांना बंदुकीच्या धाकाने धमकावताना दिसत आहे.
Manorama Khedkar Sent to Police Custody: भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिला पुणे जिल्हा न्यायालयाने 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जमिनीच्या वादातून काही लोकांना बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी मनोरमाला अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, मनोरमाला आज सकाळी रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका लॉजमधून पकडण्यात आले. अनेक दिवस ती इथे लपून बसली होती. माहितीनुसार, मनोरमाला रायगडहून पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात आणून औपचारिकरित्या अटक करण्यात आली. यानंतर मनोरमाला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून तिला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात मनोरमा पुण्याच्या मुळशी तालुक्यातील धडवली गावात जमिनीच्या वादावरून काही लोकांना बंदुकीच्या धाकाने धमकावताना दिसत आहे. तेव्हापासून पोलीस मनोरमा आणि तिचा पती दिलीप खेडकर यांच्या शोधात होते. (हेही वाचा: Protein Powder विकताना भ्रामक दावे; Supplement Firm ला ग्राहक विवाद निवारण आयोगाची चपराक, भरपाई देण्याचे आदेश)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)