Manoj Jarange-Patil Health Condition: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

आज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले.

Manoj-Jarange-Patil | Twitter

मनोज जारंगे पाटील यांना आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येरमाळा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याचबरोबर अशक्तपणा जाणवू लागला, त्यामुळे तातडीने त्यांना छत्रपती संभाजी नगरला आणण्यात आले. आज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement