Mumbai- Rat Found In Non-Vej Dish: मांसाहारी जेवणात मिळालं उंदराचे मास, वांद्र्यातील प्रसिद्ध हॉटेलमधली घटना

वांद्रे पश्चिम येथील पाली नाका येथे असलेल्या पापा पांचो ढाब्यावर हा किळसवाणा प्रकार घडला आहे

Food प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay)

एका ग्राहकाने त्याच्या जेवणात मेलेला उंदीर असल्याची तक्रार केल्यानंतर वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आणि स्वयंपाकीला अटक करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (FIR) नुसार, अनुराग सिंग आणि त्याचा साथीदार वांद्रे पश्चिम येथील पाली नाका येथे असलेल्या पापा पांचो ढाब्यावर गेले होते. त्याने रोटीसोबत चिकन आणि मटणाची प्लेट ऑर्डर केली. जेवताना त्याची नजर वेगळ्याच मांसाच्या तुकड्यावर पडली. बारकाईने तपासणी केली असता ते उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांना समजले.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now